ICHMH51NEWS.IN
9921600800

बार-बेंच समन्वयातून न्यायालयीन कामकाजांचा जलद निपटारा शक्य – जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बार-बेंच समन्वयातून न्यायालयीन कामकाजांचा जलद निपटारा शक्य – जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले

इचलकरंजी, दि. ___ : दि इचलकरंजी बार असोसिएशनतर्फे नुकतेच रुजू झालेल्या जिल्हा न्यायाधीश क्र. १ एल. डी. बिले आणि जिल्हा न्यायाधीश क्र. २ यू. सी. देशमुख यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी बार आणि बेंच यांच्यातील समन्वयातून न्यायालयीन कामकाजांचा जलद निपटारा करणे शक्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांनी केले.

कार्यक्रमात एल. डी. बिले यांचे स्वागत ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एस. बी. खंजिरे यांनी, तर यू. सी. देशमुख यांचे स्वागत ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. बी. ए. देसाई यांनी केले. आपल्या मनोगतात जिल्हा न्यायाधीश यू. सी. देशमुख यांनी न्यायालयीन प्रकरणांचा वेगाने निपटारा होण्यासाठी वकिलांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी न्यायाधीश जे. एम. नदाफ यांनी इचलकरंजी बारमधील वकिलांचे कौतुक करताना न्यायालयीन कामकाजात येथील वकील नेहमीच अग्रेसर राहिले असल्याचे नमूद केले. कार्यक्रमास न्यायाधीश पी. एन. रोकडे, न्यायाधीश आर. डी. खराटे, न्यायाधीश डी. बी. साठे, न्यायाधीश ए. एम. गायकवाड, न्यायाधीश ए. आर. कुलकर्णी तसेच न्यायाधीश एम. एस. गावडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल यांनी केले. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. इरफान जमादार यांनी इचलकरंजी बार असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेत सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन सचिव अॅड. अभिजीत माने यांनी केले, तर उपाध्यक्ष अॅड. राजाराम सुतार यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष अॅड. राजगोपाल तोष्णीवाल, उपाध्यक्ष अॅड. राजाराम सुतार, सचिव अॅड. अभिजीत माने, सहसचिव अॅड. आदित्य मुदगल, खजिनदार अॅड. विजय शिंगारे, महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर, कार्यकारिणी सदस्यांसह बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

मा. जिल्हा न्यायाधीशसो बिले व देशमुख यांचा सत्कार करताना ॲड. खंजीरे व मान्यवर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा