ICHMH51NEWS.IN
9921600800

टेक्सटाईल कारखान्यात लिफ्टमध्ये अडकल्याने कामगाराचा मृत्यू

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

टेक्सटाईल कारखान्यात लिफ्टमध्ये अडकल्याने कामगाराचा मृत्यू

इचलकरंजी :
हातकणंगले तालुक्यातील तारदाळ परिसरातील एका टेक्सटाईल कारखान्यात काम करत असताना लिफ्ट आणि भिंतीमध्ये अडकल्याने १९ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कन्हैयाकुमार शिवशंकर यादव (वय १९, मूळ रा. वार्ड क्र. ९, रसुलपूर धुरिया, जिल्हा मधेपुरा, बिहार; सध्या रा. पार्वती गेटसमोर, खोतवाडी, ता. हातकणंगले) हा युवक तारदाळ येथील श्रीरामनगर गल्ली क्रमांक ९ मधील दीपश्री टेक्सटाईलमध्ये काम करत होता.

शुक्रवारी (दि. १२) पहाटे ४.३० वाजण्यापूर्वी काम सुरू असताना तो कारखान्यातील लिफ्ट आणि भिंतीच्या दरम्यान अडकल्याने त्याच्या गुप्तांग व पाठीस गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पुढील चौकशी सुरू आहे.या प्रकरणाचा पुढील तपास शहापूर पोलिस करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा