ICHMH51NEWS.IN
9921600800

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी ३०० बेडनुसार ७९ पदांना मंजुरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी ३०० बेडनुसार ७९ पदांना मंजुरी

इचलकरंजी :
इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी ३०० बेड क्षमतेनुसार आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ७९ नवीन पदनिर्मितीस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे रुग्णालयाच्या विकासाला नवी गती मिळणार असून आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहेत.
इचलकरंजी शहरासह हातकणंगले, शिरोळ तालुका आणि सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी हे रुग्णालय महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. यापूर्वी रुग्णालयाची क्षमता २०० वरून ३०० बेडपर्यंत वाढविण्यास मान्यता मिळाली होती. मात्र त्यानुसार आवश्यक कर्मचारी उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या.
मंजूर पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी, परिचारिका, परिसेविका, ईसीजी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, लिपिक, स्वच्छता निरीक्षक, कक्षसेवक व इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या निर्णयामुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढून रुग्णांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार सेवा मिळणार आहेत. तसेच लवकरच रक्त केंद्र, रक्त विघटन केंद्र, कॅथलॅब आणि एमआरआय सुविधा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा