ICHMH51NEWS.IN
9921600800

शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती मध्ये डी. के. ए. एस. सी महाविद्यालयाचे घवघवीत यश विविध विभागाचे ६ विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता शिष्यवृत्ती यादीत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती मध्ये डी. के. ए. एस. सी महाविद्यालयाचे घवघवीत यश.विविध विभागाचे ६ विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता शिष्यवृत्ती यादीत

          इचलकरंजी :
येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, इचलकरंजी या महाविद्यालयातील ६ विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता शिष्यवृत्ती यादीत यश संपादन केले आहे. विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६   मधील विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये महाविद्यालयाच्या ६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत महाविद्यालयात करण्यात आला.
          यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. एस. के. खाडे म्हणाले, ” महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत यश मिळवून महाविद्यालयाचे लौकिक वाढवला आहे. विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमातून हे यश मिळवले आहे. संघर्ष करण्याची विद्यार्थ्यांची तयारी असतेच त्यासाठी महाविद्यालय व सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि संस्था विद्यार्थ्यांच्या नेहमीच पाठीशी आहे आणि राहील. त्या सर्व विद्यार्थ्यांनी पुढील काळात असेच यश मिळवून येणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करावा आणि आपल्या कुटुंबाचे व महाविद्यालयाचा नावलौकिक मिळवावा. ” असे गौरवोद्गार काढले. यावेळी ज्येष्ठ सेवानिवृत्त गुरुदेव कार्यकर्ते प्रा. एम एम कांबळे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी प्रीती भिसे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले.
          या गुणवत्ता शिष्यवृत्ती यादीत माने अवंती ऋषिकेश ( कॉमर्स), देशमुख गोकुळा धनंजय ( बी. सी. ए), मुल्ला सादिया राजू ( बी. सी. ए), मुल्ला आसिया राजू ( बी. सी. ए), भिसे प्रीती राजू ( समाजशास्त्र), खांडेकर सिद्धी उमेश  ( भूगोल ) विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्वच विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
           यावेळी सकाळ सत्र प्रमुख व्ही. पी. पाटील, आय क्यू एस सी प्रमुख डॉ. दीपक कुंभार, प्रबंधक श्री. आर. बी. जोग, डॉ. सुभाष जाधव, प्रा. चेतन पाटील, डॉ. दिगंबर नागर्थवार, डॉ. पी. ए. पाटील, डॉ. पूजा पारिशवाड, डॉ. ए. एस कटकोळे, डॉ. विशाल कांबळे, डाॅ. रिता रॉड्रीक्स, प्रा. प्रथमेश गवळी आदी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित होते. आभार डॉ सुनील भोसले यांनी मानले.  कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन प्रा. रोहित शिंगे यांनी केले.
यशस्वी विद्यार्थ्यांसोबत प्राचार्य एस के खाडे व स्टाफ
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा