शांतीनगर परिसरात ३०८ ग्रॅम गांजासह एक जण अटकेत
इचलकरंजी, दि. २ जुलै :
इचलकरंजी पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाईत शांतीनगर परिसरातून ३०८ ग्रॅम गांजासह गणेश चंद्रकांत नगरकर या युवकास अटक केली. या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळच्या सुमारास शांतीनगर येथील मुस्लिम कब्रस्तान व मशिदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी गणेश चंद्रकांत नगरकर (वय ३९, रा. ८/६२३, शांतीनगर, इचलकरंजी) याच्या ताब्यातून पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेला ३०८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.जप्त अमली पदार्थाची बाजारभावानुसार किंमत ७,७०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस शिपाई अमर मेघनाथ शिरढोणे यांनी फिर्याद दिली असून, इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्ह्याची नोंद पोहेकॉ. शिंदे यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळेकर करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





