रोटरी क्लब इचलकरंजी तर्फे डॉक्टर्स डे ,सीएडे व कृषी दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी:
सेवेला वेळ नसते, सेवा मनापासून केली जाते. माणसाचे कार्य चिरकाल टिकणारे असते आणि माणूस टिकला पाहिजे, हीच खरी समाजसेवा आहे. डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट आणि शेतकरी हे समाजाच्या विकासाचे तीन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. जीवनात दिखावा करण्यापेक्षा वास्तव स्वीकारून समाजासाठी काम केले पाहिजे, असे प्रतिपादन रोटरीचे डिस्ट्रिक्ट टीआरएफ चेअरमन डॉ. प्रशांत कांबळे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी अॅन्स यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स डे, सीए डे आणि कृषी दिन निमित्त आयोजित सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी असिस्टंट गव्हर्नर रो. यास्मीन मणेर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात नूतन अध्यक्ष पंकज कोठारी यांना कॉलर प्रदान, कॉल टू ऑर्डर, विश्वशांती प्रार्थना, फोर वे टेस्टचे वाचन आणि राष्ट्रगीताने झाली.
असिस्टंट गव्हर्नर यास्मीन मणेर यांनी रोटरीच्या सेवा उपक्रमांचे कौतुक केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज कोठारी यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याचा रोटरीचा उद्देश स्पष्ट केला. रोटरी अॅन्सच्या अध्यक्षा वैशाली कोठारी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. श्रुती शशिकांत कुंभार, डॉ. आकाश इंद्रकांत शहा, डॉ. राजू मनगू पुजारी, सीए उमेश दत्तात्रय कोळी, सीए सौ. प्रिती विशाल डाळया, सीए कमलेश लालजी गुप्ता, प्रगतशील शेतकरी नारायण भाऊ गायकवाड, जिनेश्वर उर्फ सतीश भुपाल चिप्रे, दिलीपकुमार बापूसो जगोजे आणि अमित प्रभाकर पाटील आदींचा उल्लेखनीय योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले. आभार सचिव सुनिल यळरूटे यांनी केले. सूत्रसंचालन शिवदास कित्तुरे व सागर पाटील यांनी केले. यावेळी प्रकाश गौड, नेमिनाथ कोथळे, वसंत पाटील, महादेव खारगे, विक्रम बुचडे, सुनील सातपुते, चंद्रकांत मगदूम, महेंद्र मुथा, अभय यळरूटे , सत्यनारायण धूत , सीए नागनाथ बसू दे मुकुंद माळीरोटरी अॅन्सच्या अध्यक्षा वैशाली कोठारी, सचिव अर्चना दबडे, सौ.वैशाली बुचडे, सौ. पुष्पा धूत, सौ. शोभा मुथा, यांच्यासह चार्टर्ड अकाउंटंट, शेतकरी, डॉक्टर्स आणि निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोटरी क्लब इचलकरंजी तर्फे डॉक्टर्स डे, सीएडे ,व कृषी दिनानिमित्त सत्कारमूर्ती समवेत प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत कांबळे सौ .यास्मिन मणेर, रोटरीचे अध्यक्ष पंकज कोठारी, सेक्रेटरी सुनील यळरुटे, प्रकाश गौड, वैशाली कोठारी ,अर्चना दबडे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




