ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीच्या ई-बस सेवेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; जेबीएम कंपनीशी करार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीच्या ई-बस सेवेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; जेबीएम कंपनीशी करार

इचलकरंजी :

शहरातील बहुप्रतीक्षित ई-बस सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली असून, इचलकरंजी महानगरपालिका आणि जेबीएम (JBM) कंपनी यांच्यात बस पुरवठ्याचा करार गुरुवारी महापालिका कार्यालयात करण्यात आला. या करारामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक स्वरूप मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

करारावर स्वाक्षरीच्या वेळी महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, परिवहन समितीच्या सभापती सौ. अरुणा प्रमोद बचाटे, स्थायी समितीचे सभापती सतीश मुळीक, परिवहन समितीच्या सदस्या शशिकला कवडे तसेच सदस्य संतोष शेळके, विठ्ठल चोपडे, चंद्रकांत शेळके, प्रमोद बचाटे आणि जेबीएम कंपनीचे अधिकारी प्रदीप उंबटकर उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या ‘ई-बस सेवा’ योजनेअंतर्गत इचलकरंजी शहरासाठी २० आधुनिक ई-बस मंजूर झाल्या असून, पहिल्या टप्प्यातील ८ बस येत्या महिनाभरात शहराच्या सेवेत दाखल होणार आहेत. उर्वरित १२ बस त्यानंतर उपलब्ध होणार आहेत.

या प्रकल्पासाठी सोलगेमळा येथे अत्याधुनिक बस डेपो उभारण्यात आला असून, शहरातील विविध भागांत बसथांबे निश्चित करण्यात आले आहेत. तसेच भविष्यात मध्यवर्ती सिटी बस स्थानक उभारण्यास महासभेने मंजुरी दिली आहे.

ई-बस सेवा सुरू करण्यासाठी आमदार डॉ. राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, आयुक्त पल्लवी पाटील तसेच परिवहन समितीच्या सभापती अरुणा बचाटे यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्याचे सांगण्यात आले. ही सेवा सुरू झाल्यानंतर नागरिकांना सुरक्षित, पर्यावरणपूरक व आधुनिक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.

काराराप्रसंगी महापौर उदय धातूंडे,अति आयुक्त सुषमा शिंदे,सभापती अरुणा बचाटे, शशिकला कवडे,प्रमोद बचाटे व जेबीएम कंपनीचे अधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा