ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत २४ तास ‘चार्ली पेट्रोलिंग’ची सुरुवात; गुन्हेगारी नियंत्रणासाठी १५ दुचाकी पथके तैनात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत २४ तास ‘चार्ली पेट्रोलिंग’ची सुरुवात; गुन्हेगारी नियंत्रणासाठी १५ दुचाकी पथके तैनात

इचलकरंजी:
शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी इचलकरंजी पोलिसांनी ‘चार्ली पेट्रोलिंग’ या दुचाकी गस्ती उपक्रमाची सुरुवात केली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून, पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर पोलीस ठाणे तसेच शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून १५ दुचाकींवर प्रत्येकी दोन पोलीस अंमलदारांची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके दिवस व रात्र अशा दोन्ही पाळ्यांमध्ये २४ तास शहरातील विविध भागांत गस्त घालणार असून, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांना तात्काळ पोलीस प्रतिसाद उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या ‘चार्ली पेट्रोलिंग’चा शुभारंभ शहर वाहतूक शाखा, इचलकरंजी येथे करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्यासह इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर पोलीस ठाणे आणि शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा