जयवंत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण
इचलकरंजी
जयवंत महाविद्यालय, इचलकरंजी
व राष्ट्रीय सेवा योजना आणि ग्रीन क्लब अंतर्गत महाविद्यालय व शहापूर खण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. वृक्षारोपण हा एक टप्पा पूर्ण झाला असला तरी भविष्यकाळात वृक्ष जगवणे हा सर्वात महत्त्वाचा टप्पा बाकी आहे. वृक्षांना वेळोवेळी पाणी घालणे व त्यांची निगा राखणे हे काम विद्यार्थ्यांनी मनापासून करावे असे आवाहन महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. दिलावर जमादार यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. विजयकुमार साठे आणि ग्रीन क्लबचे समन्वयक प्रा. गजेंद्र माळी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








