डी के ए एस सी महाविद्यालयामध्ये ऑफिसर्स एन्ट्री स्कीम मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.
इचलकरंजी : डी के ए एस सी महाविद्यालयातील एन.सी.सी विभागातील कॅडेट्स साठी आर्मी व नेव्ही मध्ये भरती होताना अधिकारी पदावर भरती होणेसाठी कोणकोणते पर्याय, मार्ग आहेत या संदर्भातील मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. या कार्यक्रमासाठी आर्मी मधील एज्युकेशन हवलदार व महाविद्यालयाचे माझी एन सी सी कॅडेट श्री. स्वागत जावीर सर हे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शनासाठी उपस्थित होते.
त्यांनी मार्गदर्शनामध्ये एन. डी. ए. प्रवेश, सी. डी. एस. प्रवेश, एन. सी. सी. स्पेशल एन्ट्री, टेक्निकल एन्ट्री, एस. एस.बी एन्ट्री व 5 डे प्रोसिजर,अग्निविर मधून आर्मीमध्ये भरती होऊन ऑफिसर पदासाठीची ए. ए. सी. एन्ट्री. अशा विविध मार्गांनी ऑफिसर पदासाठी भरती होता येते याची अत्यंत बहुमूल्य अशी माहिती श्री. स्वागत जावीर यांनी दिली. या माहितीचा भविष्यात एन सी सी कॅडेटना नक्कीच त्यांचे ध्येय गाठण्यासाठी उपयोग होईल. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो (डॉ.) एस. के. खाडे यांनी एनसीसी विभागातील कॅडेट नेहमीच अद्वितीय कामगिरी करत असल्याची भावना व्यक्त करत. या बहुमूल्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून कॅडेटनी विविध क्षेत्रात अधिकारी पदापर्यंत पोहोचावे यासाठी महाविद्यालयाकडून सर्वतोपरी मदत तसेच त्यांना यासाठी गरजेच्या व आवश्यक सर्व गोष्टींची पूर्तता केली जाईल असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे एन सी सी विभाग प्रमुख प्रा.लेफ्ट. विनायक भोई यांनी केले. सूत्रसंचालन कॅडेट चैत्राली बरगाले यांनी केले तर आभार प्रदर्शन कॅडेट सृष्टी कगुडे यांनी केले. यावेळेस महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख प्रा. सुचय खोपडे, प्रा. रोहित शिंगे, प्रा. प्रथमेश गवळी, श्री. स्वप्नील सूर्यवंशी व एन सी सी विभागातील कॅडेट उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना स्वागत जावीर सर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








