शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; ३.०५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकूण ६.१८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.
इचलकरंजी
इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने प्रतिबंधित गुटख्याविरोधात मोठी कारवाई करत ३ लाख ५ हजार १६० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या कारवाईत कार व मोबाईलसह एकूण ६ लाख १८ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी पहाटे ५.०५ वाजता वैरण बाजार परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. यावेळी रविंद्र विष्णू रेडेकर (वय ३७, रा. गोकुळ चौक, इचलकरंजी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातील एमएच-०२-बीडी-८१२१ क्रमांकाच्या होंडा सिटी कारमधून महाराष्ट्रात विक्री व वाहतुकीस बंदी असलेला ३,०५,१६० रुपयांचा गुटखा, सुगंधी सुपारी व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
याशिवाय ३ लाख रुपयांची होंडा सिटी कार आणि १३ हजार रुपयांचा व्हिवो मोबाईल जप्त करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ६ लाख १८ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








