ICHMH51NEWS.IN
9921600800

रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात मनसेचे चिखल लावून आंदोलन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात मनसेचे चिखल लावून आंदोलन

इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील भुयारी गटार योजना व भूमिगत गॅस पाईपलाईनच्या नियोजनशून्य कामांमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) इचलकरंजी शहरच्या वतीने सोमवारी महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंगावर माती व चिखल लावून प्रतीकात्मक निदर्शने केली.
यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विकासकामांना विरोध नसल्याचे स्पष्ट करत, नियोजनाअभावी शहरातील रस्त्यांवर खड्डे, चिखल आणि वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्याचा आरोप केला. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने महापौरांना निवेदन सादर केले. त्यामध्ये रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, सुरू असलेली कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करणे आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महापौरांनी निवेदन स्वीकारून मागण्यांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.
या आंदोलनात शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष वैभव भोसले यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा