ICHMH51NEWS.IN
9921600800

शहापूरमध्ये मावा उत्पादन कारखान्यावर धाड; २०.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जण अटकेत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शहापूरमध्ये मावा उत्पादन कारखान्यावर धाड; २०.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जण अटकेत

इचलकरंजी

हातकणंगले तालुक्यातील शहापूर परिसरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून २० लाख २२ हजार ६१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

शहापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोतवाडी येथील गट क्रमांक ९३ मधील गोदामावर छापा टाकण्यात आला. येथे महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून मावा उत्पादन व साठवणूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

कारवाईदरम्यान १२.३३ लाख रुपयांची २,०५६.५० किलो सुगंधित तंबाखू, २.८४ लाख रुपयांची १५० किलो कच्ची तंबाखू, मेंथॉल क्रिस्टल्स, मसाला पावडर, लिक्विड पॅराफिन, लिक्विड ग्लिसरीन, फ्लेव्हरिंग लिक्विड, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, मिक्सर, हँडहेल्ड इंकजेट प्रिंटर, कंटिन्युअस बँड सीलर आणि ३.२५ लाख रुपयांचे महिंद्रा जितो वाहन असा एकूण २०.२२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी विनायक आनंद मुठाणे (रा. आर.के. नगर, शहापूर), पुनराम सोमलाल नाईक, अविनाश राजेंद्र कोळेकर, गोपाल राम अर्जुराम नाईक आणि मुळाराम बियाराम नाईक यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यातअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक , अपर पोलीस अधीक्षक , उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या पथकाने केली.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा