ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजप महिला आघाडी आक्रमक; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निवेदन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजप महिला आघाडी आक्रमक; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निवेदन

इचलकरंजी :
इचलकरंजी शहरात महिलांवरील अत्याचार आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचा दावा करत भारतीय जनता पार्टी महिला आघाडीने सोमवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या नेत्या निताताई केळकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात महिलांवरील अत्याचार आणि कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पीडितांना तातडीने न्याय मिळावा आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
निताताई केळकर यांनी शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींसाठी कायदेशीर हक्क, सायबर गुन्हे, आत्मसंरक्षण आणि सुरक्षिततेबाबत नियमित जनजागृती अभियान राबविण्याची गरज अधोरेखित केली. सध्या बंद असलेले निर्भया पथक पुन्हा सुरू करून संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणीही त्यांनी केली.
याशिवाय अशा गुन्ह्यांच्या तपासासाठी महिला तपास अधिकारी, सक्षम तपास अधिकारी आणि अनुभवी सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे तपास अधिक जलद व प्रभावी होऊन दोषींना कठोर शिक्षा होण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
या विषयाचा सविस्तर अहवाल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे निताताई केळकर यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नसून गरज भासल्यास महिला आघाडी अधिक तीव्र आंदोलन उभारेल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी रमाताई फाटक, अश्विनी कुबडगे, सीमा कमते, सपना भिसे, योगिता दाभोळे, रंजना डावरे, नागुताई लोंढे, निता भोसले, सुवर्णा लाड, विद्या लवटे यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पो.नि. शरद मेमाणे यांना निवेदन देताना नीता केळकर,अश्विनी कुबडगे,सपना भिसे व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा