‘कन्याश्री : प्रो. डॉ. त्रिशला कदम एक प्रेरणा पर्व’ या गौरव अंकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न.
इचलकरंजी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य व अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ. त्रिशला कदम या आपल्या 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्या. त्यानिमित्त त्यांच्या सर्व माजी विद्यार्थी तसेच आत्तास्वकीय व गुरुदेव कार्यकर्त्यांकडून आपल्या भावना व्यक्त करणारा *कन्याश्री: प्रो डॉ त्रिशला कदम एक प्रेरणा पर्व* हा गौरव अंक मोठ्या उत्साहात प्रकाशित करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉ.एकनाथ आंबोकर, शिक्षण उपसंचालक,पुणे हे उपस्थित होते. आजच्या एआयच्या जमान्यामध्ये प्रो. डॉ. त्रिशला कदम यांच्यासारखे व्यक्तिमत्व आहेत. आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा एवढा सुंदर सोहळा संपन्न होतोय गौरव अंकाचे प्रकाशन होत आहे,
हे सत्य आहे. त्यांचा त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेला हा सेवासाफल्य आणि गौरव अंक प्रकाशन सोहळा नक्कीच अभिमानास्पद आहे. त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी प्राचार्य डॉ.अशोक कारंडे, प्राचार्य डॉ.एच बी पाटील, दिवाणी न्यायाधीश माननीय एकनाथ चौगुले, माजी शिक्षण सहसंचालक डॉ बाबासाहेब कदम, कन्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य माननीय डॉ. श्रुती जोशी, समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस माननीय श्री प्रसाद कुलकर्णी, तेजश्री प्रकाशनचे माननीय श्री दादासाहेब जगदाळे आणि माननीय प्रो. डॉ.सदाशिव कांबळे उपस्थित होते.
या गौरव अंकाचे संपादन कन्या महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख डॉ. अनिता आंबोकर, त्यांच्या सहकारी डॉ. प्रतिभा पैलवान आणि प्रा.स्वाती हाळवणकर यांनी केले आहे.
या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर आप्तस्वकीय, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कौतुकास्पद उपक्रम
हार, बुके, पुष्पगुच्छ यांच्या ऐवजी शालेय साहित्य स्वीकारून जपली सामाजिक बांधिलकी…..
अनाथ निराधार वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लेकरांसाठी शालेय साहित्याची नितांत आवश्यकता असते.
नुकत्याच शाळा चालू झाल्या आहेत यावेळी प्रो.डॉ.त्रिशला कदम यांनी आपल्या सेवासाफल्य सोहळ्यामध्ये असे नम्र निवेदन केले की,कुणीही येताना पुष्पगुच्छ,हार,बुके आणू नये. त्याऐवजी शालेय साहित्य आणावे त्याचा सामाजिक दायित्व म्हणून आपल्याला उपयोग करता येईल. आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ते साहित्य पोहोचवता येईल.
त्यांच्या या आवाहानाला प्रतिसाद देत शालेय साहित्य जमा झालेले आहे.त्यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कन्याश्री विशेषकांचे प्रकाशन करताना डॉ.एकनाथ आंबोकर व मान्यवर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







