मराठी भाषेच्या संवर्धनासाठी इचलकरंजीत वाहन चालकांची संवाद कार्यशाळा
इचलकरंजी : उपप्रादेशिक परिवहन विभाग, इचलकरंजी यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र माझा, मराठी माझी – संवाद भाषा, मराठी अस्मितेचा, मराठी ममतेचा” या अभियानांतर्गत शहापूर येथे रिक्षा, टेम्पो व बस चालक-मालकांसाठी संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते होते. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अंकिता वांडेकर यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, डॉ. ज्योती ठाकरे, नामदेव भोसले, डॉ. उज्वला मेहेंदळे, डॉ. हर्षदा लिखिते, शिवाजी गावडे, स्वाती गावडे आणि गौतम थोरवे यांनी मराठी भाषेचे महत्त्व, मराठी अस्मिता आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढविण्याची गरज यावर मार्गदर्शन केले. “चला मराठी बोलूया, आओ मराठी बोलेंगे” हा संदेश देत वाहन चालकांनी प्रवाशांशी शक्यतो मराठीतच संवाद साधावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास इचलकरंजी मोटर ट्रेनिंग स्कूल असोसिएशनचे प्रदीप हिंगे, अनिल महाबळे, गुंडू मस्के, जॉनी पटेकरी, आप्पा रावळ, प्रदीप कनोजे, वाहिद शेख तसेच वाहन चालक संघटनांच्या वतीने मन्सूर सावनुरकर, अनिल बम्मन्नावर, रामचंद्र जाधव, सचिन जाधव, जीवन कोळी, शशी दुर्वे, रामचंद्र खचरे, प्रताप मस्के, सदाशिव कारंडे, राजाराम माळगे, हिपरगी, शितल कांबळे, संजय येलाज, अनिल केर्ले, बिल्लूर स्वामी आणि खाजा मुजावर उपस्थित होते. याशिवाय रिक्षा, टेम्पो व बस चालक-मालक, पत्रकार आणि छायाचित्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मार्गदर्शन करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







