आज “रफी की याद में ” ही मैफल
इचलकरंजी ता. ३० समाजवादी प्रबोधिनीचे प्रबोधन वाचनालय आणि रंगयात्रा नाट्यसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार ता.३१ जुलै २०२६, सायं. ६ वाजता “रफी की याद में ” ही सिने गीतांची मैफल आयोजित केली आहे.ख्यातनाम सिने पार्श्वगायक कालवश मोहम्मद रफी यांच्या ४६ व्या स्मृतिदिनानिमित्त ही मैफल होणार आहे.
समाजवादी प्रबोधिनीचे सभागृह, ५५६/१८ इंडस्ट्रियल इस्टेट, राजर्षी शाहू पुतळ्याजवळ ,
इचलकरंजी येथे होणाऱ्या या मैफिलीस गीत,संगीत, चित्रपट रसिकांनी यावे असे आवाहन प्रसाद कुलकर्णी, प्रा.मिलिंद दांडेकर आणि अरुण दळवी यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





