ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या ६० हून अधिक संशोधनांना डिझाईन व युटिलिटी पेटंट

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या ६० हून अधिक संशोधनांना डिझाईन व युटिलिटी पेटंट

इचलकरंजी:
येथील डीकेटीई संस्थेच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी संशोधन व नवोपक्रम क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून ६० हून अधिक संशोधन संकल्पनांना डिझाईन व युटिलिटी पेटंटची मान्यता मिळवली आहे. एआयसीटीई-डीकेटीई आयडिया लॅब अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या संशोधनांना राष्ट्रीय स्तरावरील मान्यता मिळाली आहे.
डीकेटीईमध्ये संशोधन, नवोपक्रम, स्टार्टअप संस्कृती आणि बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) यांना विशेष प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांना कल्पनेपासून पेटंट आणि उत्पादनापर्यंतचा प्रवास अनुभवता यावा यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. ‘स्टार्टअप कट्टा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना उद्योगातील समस्यांवर संशोधनाधारित आणि नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. विकसित संशोधन वस्त्रोद्योगासह विविध अभियांत्रिकी क्षेत्रांतील गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन प्रक्रिया व तांत्रिक विश्लेषणासाठी उपयुक्त ठरणार आहे.
या संशोधनासाठी एआयसीटीई-डीकेटीई आयडिया लॅब, ५जी लॅब, स्टार्टअप कट्टा, अॅपल लॅब, बॉश लॅब, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि सेंटर ऑफ एक्सलन्स इन नॉनओव्हन्स यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, उपसंचालक डॉ. यु. जे. पाटील, विभागप्रमुख डॉ. व्ही. आर. नाईक, डॉ. ए. के. घाटगे व डॉ. एस. बी. रायजाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

पेटंट मिळवलेले विद्यार्थी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

बोगस बिगरशेती आदेशांच्या आधारे कोट्यवधींचे दस्त? इचलकरंजीतील व्यवहारांची फौजदारी चौकशीची मागणी” महसूल मंत्र्यांसह पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार; गट क्रमांकांतील व्यवहार रद्द करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी