” जेन झी (Gen Z) चा एल्गार” विषयावर रविवारी व्याख्यान
इचलकरंजी ता.३१ भारताची राजधानी नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने
” जेन झी (Gen Z) चा एल्गार” या विषयावर ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानाचे अध्यक्षस्थान माजी खासदार राजू शेट्टी भूषविणार आहेत.हे व्याख्यान रविवार ता. २ ऑगस्ट २०२६ सायं. ४ वाजता समाजवादी प्रबोधिनीचे सभागृह,इंडस्ट्रियल इस्टेट, राजर्षी शाहू पुतळ्याजवळ ,इचलकरंजी येथे होणार आहे. तरी या व्याख्यानास इचलकरंजी युवा परिसरातील जिज्ञासु बंधू भगिनींनी यावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






