ऑनलाईन नोंदणीसाठी यंत्रमागधारकांनी घाई करू नये : विनय महाजन
इचलकरंजी :
राज्य सरकारच्या वीजदर सवलत योजनेसाठी वस्त्रोद्योग विभागाने यंत्रमागधारकांना ऑनलाईन नोंदणी अनिवार्य केली असली, तरी नोंदणी करताना अनेक तांत्रिक व कायदेशीर अडचणी येत असल्याने घाई करू नये, असे आवाहन यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी केले आहे.
महाजन यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील विविध वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींची लवकरच समिती स्थापन होणार असून, नोंदणीची प्रक्रिया अधिक सोपी, सुरक्षित व कायदेशीरदृष्ट्या सुस्पष्ट करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे यंत्रमागधारकांनी सध्या ऑनलाईन नोंदणीची घाई करू नये.
दरम्यान, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी नोंदणीतील अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले असून, राज्यातील यंत्रमाग उद्योगाचा अचूक माहिती-संच (डेटा) तयार करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






