ICHMH51NEWS.IN
9921600800

आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

इचलकरंजी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमा अर्थात भारतीय संस्कृतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे सभागृहात झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन व संस्थेच्या प्रार्थनेने झाली.

प्रास्ताविक व स्वागत वरिष्ठ सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सुधाकर इंडी यांनी केले, तर मान्यवरांचा परिचय सौ. एकता जाधव यांनी करून दिला. यावेळी विद्यार्थिनींच्या हस्ते पालकांचे पाद्यपूजन करण्यात आले. तसेच इयत्ता ११ वी व १२ वीतील प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा प्रभारी प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कु. श्रावणी अनिल गोंदकर, कु. प्राजक्ता संजय लाड आणि कु. शगुन राजेश केसरवाणी यांनी गुरुंचे महत्त्व विशद करणारे मनोगत व्यक्त केले. पालकांनीही महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संस्कारक्षम कार्याचे कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांनी गुरु हे ज्ञानाचे खरे दैवत असून शिक्षणाबरोबर सुसंस्कारही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थिनींनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी महाविद्यालयात सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमांचा लाभ घेऊन सक्षम नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहा बडवे व अलिशा मुजावर यांनी, तर आभार प्रा. सुप्रिया पाटील यांनी मानले.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना विद्यार्थीनी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

बोगस बिगरशेती आदेशांच्या आधारे कोट्यवधींचे दस्त? इचलकरंजीतील व्यवहारांची फौजदारी चौकशीची मागणी” महसूल मंत्र्यांसह पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार; गट क्रमांकांतील व्यवहार रद्द करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी