ICHMH51NEWS.IN
9921600800

भुयारी गटरच्या निकृष्ट कामावर कारवाईची मागणी; मक्तेदाराला दंड ठोठावण्याची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भुयारी गटरच्या निकृष्ट कामावर कारवाईची मागणी; मक्तेदाराला दंड ठोठावण्याची मागणी

इचलकरंजी :

इचलकरंजी महानगरपालिकेच्या भुयारी गटर (ड्रेनेज) योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक ६ मधील माच्छरे गल्ली येथे सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत नगरसेविका सौ. विजया सुनिल महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित मक्तेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी महापौर उदय धातुंडे यांच्याकडे आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत केली आहे.सदरचे निवेदन विनय महाजन यांनी सादर केले.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून कोणतेही योग्य नियोजन न करता काम सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना शारीरिक, मानसिक व आरोग्यविषयक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मक्तेदाराकडून करण्यात येणारे काम निकृष्ट दर्जाचे असून कर्मचाऱ्यांची नागरिकांशी उद्धट वागणूक असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

निकृष्ट दर्जाचे झालेले काम भविष्यात नागरिकांसाठी अडचणीचे ठरणार असल्याने संबंधित मक्तेदार कंपनीवर महानगरपालिकेने दंड आकारावा, काम पुन्हा दर्जेदार पद्धतीने करून घ्यावे आणि आवश्यक असल्यास संबंधित कंपनीचा ठेका रद्द करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रभागातील नागरिकांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका महाजन यांनी केली आहे.

महापौर उदय धातूंडे, उपमहापौर अनिल डाळ्या यांना आमदार राहुल आवाडे,नगरसेवक प्रकाश दत्तवाडे यांच्या उपस्थितीत निवेदन देताना विनय महाजन

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

बोगस बिगरशेती आदेशांच्या आधारे कोट्यवधींचे दस्त? इचलकरंजीतील व्यवहारांची फौजदारी चौकशीची मागणी” महसूल मंत्र्यांसह पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार; गट क्रमांकांतील व्यवहार रद्द करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी