जयवंत महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे मुंशी प्रेमचंद जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी :
जयवंत महाविद्यालय, इचलकरंजी येथील हिंदी विभागाच्या वतीने हिंदी साहित्याचे महान कथाकार आणि कादंबरीकार मुंशी प्रेमचंद यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलावर जमादार हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून मराठी विभागप्रमुख डॉ. रफिक सुरज उपस्थित होते.
यावेळी मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. दिलावर जमादार यांनी आपल्या मनोगतात प्रेमचंद यांच्या साहित्याचे सामाजिक भान, वास्तववादी लेखन आणि मानवी मूल्यांची जपणूक यावर प्रकाश टाकला. तसेच आजच्या काळातही त्यांच्या साहित्याची उपयुक्तता कायम असल्याचे सांगितले.
मराठी विभागप्रमुख डॉ. रफिक सुरज यांनी प्रेमचंद यांच्या साहित्यिक योगदानाचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून समाजातील वास्तव समजून घ्यावे, असे आवाहन केले.यावेळी विभागाच्या विद्यार्थीनी रुबीना शेख, श्रुती मस्के, श्रावणी तेलवे, स्वालिहा मणियार यानी प्रेमचंद यांच्या साहित्याविषयी भित्तीपत्रक तयार केले.
कार्यक्रमाचे आयोजन हिंदी विभागाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. विजयकुमार साठे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. वैशाली सामंत व आभार प्रा. सुषमा नामे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी मुंशी प्रेमचंद यांच्या साहित्यिक कार्याला अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अभिवादन करताना उपस्थित मान्यवर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







