मेजर कर्नल विक्रम नलावडे यांची कन्या महाविद्यालयास सदिच्छा भेट.
इचलकरंजी :
दिनांक 31/07/2026 रोजी एन.सी.सी. च्या प्रथम वर्षासाठी भरती आयोजित करण्यात आली होती. एकूण 18 जागांसाठी जवळजवळ 108 अर्ज आले होते. यामध्ये उंची, वजन, शटल रन, रनिंग, लेखी टेस्ट घेण्यात आल्या. अतिशय उत्साहामध्ये एन.सी.सी. प्रथम वर्षाची भरती संपन्न झाली.
याप्रसंगी 6 महाराष्ट गर्ल्स बटालियनचे कमांडिंग ऑफिसर मेजर कर्नल विक्रम नलावडे यांनी एन.सी.सी. ऑफिसला सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासोबत एस.एम. नारायण पाटील उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांनी कमांडिंग ऑफिसर यांचे स्वागत केले. तसेच एन.सी.सी.विभाग आणि महाविद्यालयाची माहिती दिली. त्याचबरोबर नवीन भरती प्रक्रियेस शुभेच्छा दिल्या. कॅप्टन प्रमिला सुर्वे आणि 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे पी.आय. स्टाफ योगेश सोनवणे यांनी भरती प्रक्रिया पूर्ण केली.

कर्नल विक्रम नलावडे यांचे स्वागत करताना प्रा.डॉ.श्रुती जोशी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800