लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात अभिवादन
इचलकरंजी :
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष पोळ यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी समाजप्रबोधन, सामाजिक समता आणि मराठी साहित्य क्षेत्रातील अण्णाभाऊ साठे यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. त्यांच्या विचारांचा समाजात प्रसार होणे आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांच्या कार्याचा आदर्श घेणे ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीमती चारुशिल्पा येमल, सार्वजनिक आरोग्य परिचारिका प्रांजली दुधवडकर, मुकादम, सहा मुकादम, कार्यालयीन अधिकारी तसेच रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रद्धापूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या समतेच्या, मानवतेच्या आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार व्यक्त केला.
अभिवादन करताना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







