इचलकरंजीत भव्य न्याय संकुल बांधणेस सर्वतोपरी सहकार्य- आमदार राहुल आवाडे
इचलकरंजी –
इचलकरंजी न्यायालयामधील वाढती न्यायालयीन प्रकरणे, न्यायालयीन इमारतीची कमतरता, वकिलांची वाढती संख्या व पार्किंगची अडचणी या सर्व पार्श्वभूमीवर इचलकरंजीमध्ये आवश्यक सोयी-सुविधांनी सज्ज असे अद्ययावत न्यायसंकुल होणे आवश्यक आहे. अशा न्याय संकुल इमारतीचे तातडीने बांधकाम सुरु होणेबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार राहुल आवाडे यांनी दिले.
आमदार राहुल आवाडे यांनी शनिवारी शहरातील नियोजीत न्याय संकुल जागेस प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील, महानगरपालिकेचे अधिकारी, दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल व वकिल मंडळी उपस्थित होते. यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी शहरास साजेशी सर्व सोयीनियुक्त न्याय संकुलाचे काम तातडीने सुरु करणेस आपण प्रयत्नशील राहू असे सांगितले. यावेळी दि इचलकरंजी बारअसोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष अॅड. राजाराम सुतार, सेक्रेटरी अॅड. अभिजीत माने, जॉ. सेक्रेटरी अॅड. आदित्य मुदगल, खजिनदार अॅड. विजय शिंगारे, महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर, कार्यकारिणी सदस्य अॅड. महेश कांबळे, अॅड. राहुल काटकर, अॅड. शैलेंद्र रजपूत, अॅड. किर्ती जैंद, अॅड. अर्चना कुलकर्णी (ओगले), कोल्हापूर जिल्हा नोटरी संघाचे अध्यक्ष सिनिअर अॅड. अमित सिंग, सिनिअर अॅड. आर. व्ही. मुदगल, सीनियर अॅड. अनिल रुईकर, अॅड. इरफान जमादार, अॅड. डी.डी. पाटील, अॅड. शिवराज चुडमूंगे, अॅड. भरत जोशी, अॅड. वैजनाथ पाटील, अॅड. सुधीर मस्के, अॅड. मंजुनाथ भाट, अॅड. सारंग जोशी, अॅड. शहानवाजराज पटेल, अॅड. अल्ताफ मुजावर, अॅड. शरद शिंदे, दि इचलकरंजी बार असोसिएशनचे क्लार्क प्रवीणभाऊ फगरे व दि इचलकरंजी बार असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.
जागेची पाहणी करताना आ.राहुल आवाडे व बार असोसिएशनचे सदस्य
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







