रेकॉर्डवरील आरोपी पिंटू रॉय दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार
इचलकरंजी :
शहापूर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील रेकॉर्डवरील आरोपी पिंटू उपेंद्र रॉय (रा. तुळजाभवानी अपार्टमेंट, शहापूर, ता. हातकणंगले) याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
मा. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार रेकॉर्डवरील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ च्या कलम ५६(१)(ब) अंतर्गत कारवाई करून हद्दपार प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत. त्यानुसार शहापूर पोलीस ठाण्याने पिंटू उपेंद्र रॉय याच्याविरुद्ध हद्दपारचा प्रस्ताव सादर केला होता. संबंधित आरोपीविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात तीन दखलपात्र आणि तीन अदखलपात्र असे एकूण सहा गुन्ह्यांची नोंद आहे.
या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी यांनी पिंटू उपेंद्र रॉय याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश दिले.
त्या आदेशाची अंमलबजावणी करत शहापूर पोलिसांनी आजपासून पिंटू उपेंद्र रॉय याला दोन वर्षांच्या कालावधीसाठी कोल्हापूर जिल्ह्याबाहेर हद्दपार केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी दिली
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







