ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि साहित्यरत्न,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि साहित्यरत्न,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

इचलकरंजी
                       इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज शनिवार  दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त   शहरातील राजवाडा चौक येथील त्यांच्या पुतळ्यास  तसेच साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शहरातील किसनराव आवळे मैदान येथील त्यांच्या पुतळ्यास आमदार डॉ. राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील,  यांच्या हस्ते आणि उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, समाज कल्याण सभापती रुबन आवळे, नगरसेवक रवी रजपुते, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते, अभिषेक वाळवेकर, नगरसेवक राजू बोंद्रे, ओंकार सुर्वे,  नगरसेविका प्रियांका इंगवले, नगरसेविका क्रांती आवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
            याप्रसंगी
 माजी नगरसेवक अब्राहम आवळे, नागेश पाटील, जि.प. सदस्य राहुल आवळे, माजी जि.प.सदस्या स्मिता आवळे, कामगार नेते राजेश रजपुते, सहा आयुक्त नितिन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, अजय जाधव, महादेव देसाई, सचिन शेडबाळे, महेश बुचडे, मंजुनाथ खंदारे, दिलीप मगदुम, विकास कांबळे आदी उपस्थित होते.
आण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करताना माजी मंत्री प्रकाश आवाडे व मान्यवर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा