इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात जागतिक हिपॅटायटिस दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी :
इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात जागतिक हिपॅटायटिस दिन विविध जनजागृती उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना हिपॅटायटिस या आजाराविषयी मार्गदर्शन करून प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या बोराडे, अधिसेविका श्रीमती चारुशिल्पा येमल तसेच आहारतज्ज्ञ श्रीमती भोला यांनी उपस्थितांना हिपॅटायटिसची लक्षणे, संसर्गाची कारणे, वेळेवर निदान, लसीकरणाचे महत्त्व आणि नियमित आरोग्य तपासणीची आवश्यकता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नागरिकांनी आरोग्याबाबत जागरूक राहून प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास सहा अधिसेविका श्रीमती सीमा कदम, बालरुग्णतज्ज्ञ परिचारिका श्रीमती विद्या मगदूम, बाह्यरुग्ण विभागाच्या परिसेविका श्रीमती रोहिणी चंदनशिवे, रुग्ण व त्यांचे नातेवाईक, रुग्णालयातील विविध विभागांतील परिसेविका, डॉक्टर, परिचारिका, परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाद्वारे हिपॅटायटिसबाबत जनजागृती करून वेळेवर निदान, उपचार आणि लसीकरणाच्या माध्यमातून या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळविण्याचा संदेश देण्यात आला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







