ICHMH51NEWS.IN
9921600800

घनकचरा व्यवस्थापनाचा २२ कोटीच्या  बेकायदेशीर ठरावाची अंमलबजावणी करू नये : शशांक बावचकर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

घनकचरा व्यवस्थापनाचा २२ कोटीच्या  बेकायदेशीर ठरावाची अंमलबजावणी करू नये : शशांक बावचकर

इचलकरंजी :

इचलकरंजी महानगरपालिकेच्या २७ जुलै २०२६ रोजी झालेल्या विशेष महासभेत मंजूर करण्यात आलेला घनकचरा व्यवस्थापनाचा २२ कोटी रुपयांचा अंदाजपत्रकाचा ठराव बेकायदेशीर असून त्याची अंमलबजावणी करू नये, अन्यथा न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक तथा अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, १५ जुलै २०२६ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापनाचा २२ कोटी रुपयांचा अंदाजपत्रकाचा विषय बहुमताने नामंजूर झाला होता. मात्र अवघ्या १२ दिवसांत तोच विषय २७ जुलैच्या विशेष महासभेत मंजुरीसाठी ठेवून २४ उपस्थित सदस्यांच्या एकमताने मंजूर करण्यात आला.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील अनुसूची ‘ड’तील तरतुदीनुसार तीन महिन्यांच्या आत अशा ठरावात फेरबदल करण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया व आवश्यक सदस्यसंख्येचा पाठिंबा बंधनकारक आहे. तसेच ठरावातील बदलाबाबतची सूचना व प्रस्तावही नोटिशीत नमूद करणे आवश्यक असते. या सर्व कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता ठराव मंजूर करण्यात आल्याचा दावा बावचकर यांनी केला असून, सदर ठरावाची अंमलबजावणी थांबविण्याची मागणी केली आहे.निवेदनाच्या प्रती महापौर,उपमहापौर,विरोधीपक्ष नेते यांना देण्यात आलेल्या आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा