बिशप्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
इचलकरंजी, प्रतिनिधी :
बिशप्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजीच्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत मनाल मुस्तफा मुजावर हिने प्रथम, स्वालिहा अबुबकर घोरी हिने द्वितीय तर हादी वसीम मुल्ला याने तृतीय क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली.
तसेच इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत मरियम अयुब पाटवेगार हिने प्रथम तर रिदा जावेद जमादार हिने द्वितीय क्रमांक पटकावत यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन हाजी कैस बागवान तसेच व्हाईस चेअरमन हाजी इम्तियाज म्हैशाळे यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षक व शाळेच्या सर्व शिक्षकांचेही कौतुक करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. शाळेने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







