ICHMH51NEWS.IN
9921600800

कन्या महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लेखन प्रेरणा दिन उत्साहात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कन्या महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लेखन प्रेरणा दिन उत्साहात

इचलकरंजी :

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा विभागाच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक व व्याख्याते डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. “दुसऱ्यांच्या वेदना समजून घेणारी व्यक्तीच खरा साहित्यिक होऊ शकते. जीवनाकडे आस्वादक दृष्टीने पाहिल्यास प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येतो,” असे प्रतिपादन त्यांनी केले. भारतीय तसेच जागतिक साहित्याचा अभ्यास करून वाचनाची सवय जोपासण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. श्रुती जोशी होत्या. त्यांनी विद्यार्थिनींनी या व्याख्यानातून प्रेरणा घेऊन लेखनाची वाटचाल सुरू करावी, असे आवाहन केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभागप्रमुख डॉ. अनिता आंबोकर यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. अंकुश कुरणे, तर आभार प्रा. सुधाकर इंडी यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मार्गदर्शन करताना प्रा.सुनीलकुमार लवटे व्यासपीठावर प्राचार्य डॉ.श्रुती जोशी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा