ICHMH51NEWS.IN
9921600800

महाविकास आघाडीचे लाक्षणिक उपोषण; विविध प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाविकास आघाडीचे लाक्षणिक उपोषण; विविध प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहरातील खड्डेमय रस्ते, कचरा संकलन, अस्वच्छता आणि महापालिकेच्या कारभाराविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीतील विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील नागरी समस्यांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

विरोधी पक्षनेते तथा गटनेते उदयसिंग पाटील यांनी कचरा संकलनाचा मक्ता, शहरातील अस्वच्छता, खड्डेमय रस्ते आणि महापालिकेच्या एकूण कारभारावर सडकून टीका केली. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असतानाही प्रशासन आणि सत्ताधारी त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

शशांक बावचकर यांनी महापालिका प्रशासन, आयुक्त, महापौर आणि आमदारांच्या भूमिकेवर टीका करत आमदार राहुल आवाडे यांच्या हस्तक्षेपामुळे महापालिका प्रशासनाची दुर्दशा झाल्याचा आरोप केला.

नगरसेवक संजय तेलनाडे यांनी शहरातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आमदार राहुल आवाडे यांच्यावरही टीका केली. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदारांविरोधात घोषणाबाजी केली.

सागर चाळके यांनी महापलिकेतील अपुऱ्या नागरी सुविधा व खड्डे यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले

उपोषणादरम्यान महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करून सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खड्डेमुक्त रस्ते, नियमित व प्रभावी कचरा संकलन, शहरातील स्वच्छता आणि महापालिका कारभारात सुधारणा करण्याच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या व गटनेते विठ्ठल चोपडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. शहरातील खड्डे, कचरा व स्वच्छतेसह प्रमुख मागण्यांबाबत प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करून त्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी प्रकाश मोरबाळे, संजय चौगुले, अमरजीत जाधव, रणजित जाधव, सदा मलाबादे यांच्यासह नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उपोषणस्थळी उपस्थित महाविकास आघाडीचे पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा