इचलकरंजी महानगरपालिकेच्या वृक्ष समितीची नियुक्ती
वृक्षसंवर्धन व हरित क्षेत्र वाढीसाठी एक वर्षासाठी समिती कार्यरत
इचलकरंजी : शहरातील वृक्षसंवर्धन, वृक्षांचे संरक्षण, पर्यावरणाचा समतोल राखणे तसेच शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने इचलकरंजी महानगरपालिकेने वृक्ष समितीची एक वर्षासाठी नियुक्ती केली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून सदस्य म्हणून नंदू परळकर, रोशनी गोडे, योगेश चांगदेव पाटील, स्नेहल दीपक रावळ, मनीषा प्रशांत नवनाळे, प्रदीप नामदेव धुत्रे, नूतन दिलीप मुथा, अमरजीत राजाराम जाधव, पद्मा लक्ष्मण सावरतकर, तात्यासो कुंभोजे, सुरज राठी, अतुल पळसुले, किरण दंडगे आणि युवराज शिंगाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता पर्यावरणाचे संरक्षण करणे, उपलब्ध वृक्षसंपदेचे जतन करणे आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणे, या उद्देशाने समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठीही प्रभावीपणे काम करण्यात येणार आहे.
“हरित, सुंदर आणि पर्यावरणपूरक इचलकरंजी” घडविण्यासाठी महानगरपालिका, वृक्ष समिती आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






