देशी दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या एकास अटक; ४.६० लाखांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने देशी दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या एकास ताब्यात घेत त्याच्याकडून देशी दारूचे १५ बॉक्स आणि टाटा इन्ट्रा चारचाकी वाहन असा एकूण ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८.४५ वाजता वैरण बाजार ते जुना चंदूर रोडवरील दुर्गामाता मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित वाहनाची तपासणी केली. यावेळी हुसेन गणी शेख (वय ३०, रा. दत्तमंदिर शेजारी, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) याच्याकडून देशी दारूचे १२ बॉक्स आणि टँगो पंचचे ३ बॉक्स असा एकूण ६० हजार रुपयांचा दारूसाठा आढळून आला. तसेच ४ लाख रुपये किमतीची टाटा इन्ट्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची चारचाकी (क्र. एमएच ५१ सी ०८०६) जप्त करण्यात आली.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास विकास चौगुले करीत आहेत.
दारूचे बॉक्स व चारचाकी वाहनासह आरोपी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





