ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत गणेशमूर्ती विसर्जनासाठी ४६ कृत्रिम कुंडांची व्यवस्था

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा


इचलकरंजीत गणेशमूर्ती विसर्जनासाठी ४६ कृत्रिम कुंडांची व्यवस्था

इचलकरंजी : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने यंदा घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध भागांत ४६ कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात येणार आहे. शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी नागरिकांना या कुंडांचा वापर करता येणार असून, शहापूर खण येथेही गणेशमूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

महानगरपालिकेने झोननिहाय कुंडांची व्यवस्था केली असून, झोन ‘ए’मध्ये १४, झोन ‘बी’मध्ये १४, झोन ‘सी’मध्ये १०, तर झोन ‘डी’मध्ये ८ ठिकाणी कुंड उभारण्यात येणार आहेत. यामध्ये महासत्ता चौक, नारायण टॉकीज, शिवतीर्थ, किसान चौक, मराठा चौक, थोरात चौक, शहापूर गाव चावडी, सांगली नाका आदी प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

जलप्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी घराजवळील कृत्रिम विसर्जन कुंडाचा अथवा शहापूर खणचा वापर करावा. गणेशोत्सव स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर उदय धातुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा