ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीई-मध्ये गणेशोत्सव २०२६ अंतर्गत राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका या संकल्पनेतून सजावट

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीई-मध्ये गणेशोत्सव २०२६ अंतर्गत राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका या संकल्पनेतून सजावट

इचलकरंजी:
 डीकेटीईमध्ये नेहमीच समाजउपयोगी विषयावर प्राधान्य दिले जाते गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा जपत यावेळी डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी यंदा राष्ट्रनिर्मितीत युवकांची भुमिका ही प्रेरणादायी संकल्पना साकारली आहे. सोबतच डीकेटीईमधील सर्व ब्रँचेसशी संलग्न क्षेत्रांत भारताची चालू असलेली प्रगती व भविष्यातील उद्दीष्टये दर्शवणारी डिजीटल फलक डिझाईन करुन देखावा सुंदर पध्दतीने मांडला आहे. भारतीय युवक व ते करत असलेले वेगवेगळया क्षेत्रातील संशोधन आणि त्यातून होणारी उद्याची राष्ट्रनिर्मिती याचे साक्षात दर्शन होत आहे.
युवाशक्ती ही राष्ट्राची शक्ती या विचाराला केंद्रस्थानी ठेवून साकारलेल्या या गणेश सजावटीत देशाच्या प्रगतीमध्ये युवकांचे योगदान, जबाबदारी आणि भविष्यातील भूमिका प्रभावीपणे आधोरेखित करण्यात आली आहे. शिक्षण, कौशल्य, नवकल्पना, तंत्रज्ञान, उद्योजकता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवा या माध्यमातून सक्षम युवकच विकसित व आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावू शकतात, हा संदेश सजावटीतून देण्यात आला आहे.
सजावटीतील विविध घटकांमधून आजचा युवक घडला तर उद्याचा भारत घडेल हा संदेश प्रभावीपणे मांडला आहे. टेक्स्टाईल विभागातील विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व आकर्षक वस्त्रनिर्मिती, तर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आधुनिक रोबोटीक्सद्वारे उद्योगविश्‍वातील तांत्रिक प्रगतीचा अविष्कार याचे सादरीकरण यावेळीच्या गणेशोत्सावामध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी दरबार हॉल मध्ये केलेले आहे.
सदर उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी भेट देवून विद्यार्थ्यांचे व मागदर्शकांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांस संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील यांचेसह सर्व विभागप्रमुख, सोशल विभागाचे सर्व सदस्य यांचे मागदर्शन लाभले तर विद्यार्थी प्रतिनिधी गौरी हातरकी, प्राजक्ता चव्हाण, प्रणुती शेंडे, समृध्दी लोकरे, आर्यन पाटील, अंशिका शर्मा, तंजीला खान, गायत्री फडके, जहीर नदाफ, हिमेश्‍वरी, तीर्थराज पाटील, नेहा बेरा, श्रावणी वरुटे, श्रावणी वारेकर, इंद्रनील थानेकर, चैतन्य मिरगे, आदित्य जाधव, सुजल विभुते व प्रणव चौगुले यांनी सदर देखावा साकरण्यास परिश्रम घेतले.
फोटो ओळी – डीकेटीईमध्ये साकरण्यात आलेल्या गणेशोत्सवामध्ये राष्ट्रनिर्मितीत युवकांची भुमिका हा देखावा
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा