ICHMH51NEWS.IN
9921600800

गणेशोत्सव काळात इचलकरंजीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बदल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गणेशोत्सव काळात इचलकरंजीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बदल

इचलकरंजी :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाढती गर्दी आणि गणेशमूर्ती आगमन मिरवणुकांमुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील मुख्य रस्त्यांवर सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच गणेशमूर्ती आगमन मिरवणुका आणि सणानिमित्त खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेकडून नियोजन करण्यात आले आहे.
जनता चौक ते गांधी पुतळा या मुख्य बाजारपेठेत रविवारी मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शिवतीर्थ येथून जनता चौकाकडे जाणारी चारचाकी वाहने बंद करण्यात आली आहेत. ही वाहने शिवतीर्थ येथून संभाजी चौकमार्गे पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहेत.
तसेच राजवाडा चौकातून जनता चौकाकडे येणारी चारचाकी वाहने बंद करून ती रसना कॉर्नरमार्गे वळविण्यात येत आहेत.
नागरिकांनी या वाहतूक बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि शहर वाहतूक शाखेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा