ICHMH51NEWS.IN
9921600800

एमडी प्रकरणातील आरोपीकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

एमडी प्रकरणातील आरोपीकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त

शहापूर पोलिसांची कौशल्यपूर्ण तपासातून कारवाई; दुचाकीसह १ लाख ९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

इचलकरंजी, दि. २३ : शहापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अंमली पदार्थांच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करताना पोलिसांनी आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईत दुचाकीसह एकूण १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शहापूर ओढा ते आर.के. नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दि. १८ सप्टेंबर रोजी एमडी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी धनाजी उर्फ पिंटू पांडुरंग जाधव याच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्याच्याकडून २८ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिल्यानंतर तपासादरम्यान त्याने काही अंमली पदार्थ सुशांत मनोज माने (वय २९, रा. मैल खड्याजवळ, ओंकारनगर, इचलकरंजी) याला विकल्याची माहिती समोर आली.

त्यानुसार सुशांत माने याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पिस्तूल व दोन जिवंत राउंड असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या मोटारसायकलच्या सीटखाली ठेवलेले पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे पंचांसमक्ष जप्त करण्यात आली. तसेच ३५ हजार रुपये किमतीची होंडा हंक मोटारसायकल (एमएच-०९-ईसी-००१६) जप्त करण्यात आली.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, पोउनि महावीर कुटे, अविनाश मुंगसे, रोहित डावाळे, सतीश कुंभार, इरफान शेख व संतोष जाधव यांनी ही कारवाई केली. पुढील तपास महावीर कुटे करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा