अखेर वीजदर सवलतीचे परिपत्रक निघाले,सर्वांच्या पाठपुराव्याला यश.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अखेर वीजदर सवलतीचे परिपत्रक निघाले,सर्वांच्या पाठपुराव्याला यश.

इचलकरंजी –
वीज सवलतीसाठी शासन दरबारी केलेल्या आमदार प्रकाश आवाडे,खासदार धैर्यशील माने,वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे,सर्व यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनोधी यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने २७ अश्‍वशक्तीवरील यंत्रमागाला प्रतियुनिट ७५ पैशांची अतिरिक्त व २७ अश्‍वशक्तीखालील यंत्रमागाला प्रतियुनिट १ रुपयांची अतिरिक्त वीज सवलत संदर्भातील अध्यादेश सोमवारी (२ सप्टेंबर) जारी करण्यात आला आहे. दोनच दिवसांपूर्वी आमदार आवाडे यांनी वीज सवलत अंमलबजावणीचा अध्यादेश आठवडभरात निघेल असे भाष्य आमदार आवाडे यांनी केले होते. या अध्यादेशामुळे राज्यभरातील यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १५ मार्च २०२४ पासून करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे,विठ्ठल चोपडे,अशोक स्वामी यांनी दिली.
मागील काही वर्षांपासून अडचणीतून मार्गक्रमण करीत असलेल्या वस्त्रोद्योगाला उभारी मिळण्यासाठी जाहीर केलेल्या वीज सवलतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी यासाठी शहरातील सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व वस्त्राद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वीज सवलत देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री शिंदे यांनी कोरोची येथील कार्यक्रमात २७ अश्‍वशक्तीवरील यंत्रमागाला प्रतियुनिट ७५ पैशांची अतिरिक्त व २७ अश्‍वशक्तीखालील यंत्रमागाला प्रतियुनिट १ रुपयांची अतिरिक्त वीज सवलत संदर्भातील जाहीर घोषणा केली होती. परंतु त्यावेळच्या अध्यादेशात वीज सवलतीसाठी नोंदणीची अट रद्द न करण्यात आल्याने आणि यंत्रमागधारक ही किचकट नोंदणी करु शकत नसल्याने नोंदणीची अट रद्द करावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती. नोंदणी अटीमुळे वीज सवलतीचा लाभ मिळण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ही अट करण्याबाबत पाठपुरावा करण्याबाबत होत असलेल्या मागणीनंतर नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत नोंदणीची अट रद्द करुन सवलत देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
यंत्रमागधारकांत समाधान
वीज सवलतीचा अध्यादेश (जीआर) काढण्यात आला नसल्याने उलटसुलट चर्चा होऊ लागली होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर दोनच दिवसांपुर्वी यांनी पत्रकार परिषदेत वीज सवलतीचा जीआर आठवडाभरात निघेल असे भाष्य केले होते. आणि लगेचच जीआर निघाल्याने यंत्रमागधारकांत समाधान व्यक्त होत आहे.- आ.प्रकाश आवाडे.
यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकेंद्रित स्वरूपात करण्यात येत असल्याने, या व्यवसायाच्या नोंदणी करण्यामध्ये अनेक अडचणी होत्या. त्यामुळे यंत्रमागधारक व्यवसायाची नोंदणी करू शकत नव्हते. साहजिकच या अतिरिक्त वीजदर सवलतीचा लाभ यंत्रमानधारकांना मिळत नव्हता. ही अट रद्द व्हावी यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न चालू होते.
         दरम्यान दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी इचलकरंजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालय उद्घाटनाकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे इचलकरंजी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी हा प्रश्न मार्गी लावणे बाबत नामदार पवार यांना विनंती केली होती. याची दखल घेऊन तातडीने १३ ऑगस्ट २०२४  रोजी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अट शिथिल करण्याचा तसेच १५ मार्च २०२४ पासून हीच वीजदर सवलत लागू करण्याचा निर्णय नामदार अजित दादा पवार आणि वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने घेण्यात आला होता. सदर शासन निर्णयातील दुरुस्ती करिता असणारी प्रक्रिया पूर्ण करून नवीन शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला. यामुळे यंत्रमागधारकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
विठ्ठल चोपडे, राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष.
इचलकरंजी शहरातील वस्त्रोद्योगाच्या वीजदर सवलतीचा मुद्दा बऱ्याच कालावधी पासून प्रलंबित होता,हा प्रश्न मार्गी लागण्यास वस्त्रोद्योग महासंघामार्फत प्रयत्न केले असून भविष्यात ही आम्ही वस्त्रोद्योगासाठी कटिबद्ध आहोत.
अशोक स्वामी,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ.

राज्यातील यंत्रमागधारकांना वीज बिलातील अतिरिक्त सवलत मिळण्या करीता नोंदणी ची अट शिथिल केल्याचे परिपत्रक आज 2 सप्टेंबर 2024 रोजी शासनाने प्रसिद्ध केले आहे ही राज्यातील यंत्रमागधारकांच्या साठी दिलासा देणारी बाब आहे
या बद्दल सर्वच लोकप्रतिनिधी चे सर्व यंत्रमागधारक संघटना च्या प्रयत्नाला यश आले आहे
यंत्रमागधारक मित्रांनो आता आपण वाट पहायची आहे ती म्हणजे येणाऱ्या बिलात ही सवलत 15 मार्च पासून लागू होणार की नाही एवढेच तरी या महिन्याच्या 5 तारखे नंतर आपली वीज बिले ऑनलाईन दिसतील त्या नंतर आपला जीव भांड्यात पडणार आहे.

विनय महाजन,अध्यक्षयंत्रमागधारक जागृती संघटना.

 

बऱ्याच दिवसाच्या प्रयत्नातून नोंदणी शिथिल झाली हे स्वागतार्थ आहे पण सवलत मागणी होती त्या काळापासून मिळायला पाहिजे.
विकास चौगुले
अध्यक्ष स्वाभिमानी यंत्रमाधारक संघटना

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More