वीजदर सवलत पोकळ थकबाकीत जमा झाल्याने यंत्रमागधरकांत खळबळ,आंदोलन करण्याचा विनय महाजन यांचा इशारा.
इचलकरंजी
राज्यातील २७ अश्वशक्ती खालील यंत्रमागधारकांना १ रु प्रती युनिट आणि २७ अश्वशक्ती वरील यंत्रमागधारकांना ७५ पैसे प्रती युनिट ची सवलत जाहीर केली व सध्याच्या आलेल्या बिलात १५ मार्च २०२४ पासून (पूर्वलक्षी प्रभावाने) लागू करण्यात आलेली बिले नुकतीच ऑनलाईन वर देण्यात आलेली आहेत त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा राज्यातील यंत्रमागधारकांना मिळाला आहे त्या बद्दल महाराष्ट्र सरकार चे मनःपूर्वक अभिनंदन
परंतु या आनंदा वर विरजण घालण्याचा प्रकार महावितरण कंपनी ने केला आहे
२०२० साली २७ अश्वशक्ती वरील यंत्रमागधारकांना ऑनलाईन नोंदणी न केल्याने विज सवलत बंद करण्यात आली होती नंतर राज्यभर आंदोलन झाल्यानंतर दोन महिन्या नंतर पुन्हा ते अनुदान सुरू करण्यात आले होते परंतु त्या दोन महिन्याचे वीज बिल अनुदान वजा न होता आल्यामुळे त्या दोन महिन्याची पोकळ थकबाकी बिलात दिसून येत होती राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळे ती पोकळ थकबाकी रद्द करण्यात आली होती परंतु त्या पोकळ थकबाकीवरील व्याज आणि दंड ते मात्र माफ झाले नव्हते त्यामुळे बिलात पोकळ थकबाकीवरील व्याज व दंड मागील थकबाकी म्हणून येत होते इचलकरंजीतील यंत्रमागधारक जागृती संघटनेने वेळोवेळी या पोकळ थकबाकीवरील व्याज दंड लवकरात लवकर माफ व्हावे याकरिता बरेच प्रयत्न केले परंतु आज तगायत या पोकळ थकबाकीवरील व्याजदंड माफ करण्यात आलेले नव्हते व सध्या जी वीज बिलातील अतिरिक्त सवलत लागू करण्यात आलेली आहे ती महावितरण कंपनीने चतुराईने त्या पोकळ थकबाकीवरील व्याज व दंडात वजा केलेली आहे म्हणजे २७ अश्वशक्ती वरील यंत्रमाग धारकांना प्रत्यक्षपणे या वीजबिलातील अतिरिक्त सवलतीचा लाभ मिळालेला नाही तो महावितरण कंपनीने स्वतःच्या थकबाकीत वळता करून घेतला आहे ही फसवा फसवी महावितरण कंपनीने बंद करावी अन्यथा पुन्हा महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करावे लागेल व महावितरण कंपनीने पोकळ थकबाकीवरील व्याज व दंडात जी रक्कम वळती करून घेतलेली आहे ती बिले रद्द करून नवीन बिले त्वरित यंत्रमाग धारकांना वितरित करावी अशी मागणी यंत्रमागधारक जागृती संघटनेतर्फे विनय महाजन यांनी केली आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800