डीकेटीईमध्ये एसआयएच २०२४ अंतर्गत इंटर्नल हॅकेथॉन चे आयोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईमध्ये एसआयएच २०२४ अंतर्गत इंटर्नल हॅकेथॉन चे आयोजन.
इचलकरंजी
एज्युकेशन मिनिस्ट्री, भारत सरकार इन्व्होएशन सेल, एआयसीटीई दरवर्षी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही स्पर्धा अयोजित करीत असते. यासाठी भारतभरातील इंजिनिअरींग कॉलेजसच्या विद्यार्थ्यांकडून विविध सामाजिक, तसेच कंपनीकडून आलेल्या प्रश्‍नांकरीता प्रोजेक्ट अधारित मॉडेल्स सोल्यएशन्सचे प्रदर्शन भरविले जाते आणि उत्कृष्ट मॉडेल सोल्यएशन्सला फंड पुरवठा सुध्दा केला जातो. त्याअंतर्गत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती देणारी ही स्पर्धा नुकतेच डीकेटीईमध्ये भरविण्यात आली होती.
डीकेटीईच्या युक्तीसेल,स्टार्टअप सेल आणि आयडिया लॅब अंतर्गत इंटर्नल एस.आय.एच. हॅकेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध विभागातून ५२ संघानी सहभाग नोंदवला होता व आपल्या प्रोजेक्टसचे जजेस समोर सादरीकरण केले व प्रात्यक्षिक दिले. यामधील प्रोजेक्टस हे एआयसीटीई आणि मिनीस्ट्री ऑफ एज्युकेशन इनोव्हेशन सेल मार्फत घेतल्या जाणा-या देशस्तरावरील स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहेत.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली पन्नासहून अधिक उपकरणे वैज्ञानिक संशोधनातील चमत्काराची वैशिष्ठये दाखवून देणारी होती. शेतीपासून नागरी सुरक्षेपर्यंत आणि अंतराळ संशोधन क्षेत्रापासून औद्यगिक ऍटोमेशिएन पर्यंत इंजिनिअरींगच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर याची अनुभूती आज डीकेटीईमध्ये पहावयास मिळाली. या प्रदर्शनामुळे विविध इंजिनिअरींग क्षेत्रातील उपकरणे व समाजउपयोगी प्रोजक्ट बनविन्यासाठीचा आत्मविश्‍वास वाढलेला दिसून आला. तसेच या स्पर्धेदरम्यान परिक्षकांनी केलेल्या अचूक व संयुक्तीक मागदर्शनामुळे विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात अशा प्रकारची उपकरणे बनवियासाठी निश्‍चितच लाभ होईल असा विश्‍वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. या प्रदर्शनाच्या संयोजनाकरीता युक्ती सेलचे सर्व मेंबर्स, आयडिया लॅब प्रमुख, स्टार्ट अप सेल प्रमुख यांनी विषेश परिश्रम घेतले.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे व सर्व विश्‍वस्त, संचालिका प्रा.डॉ. एल.एस. आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील यांचे विषेश मार्गदर्शन लाभले तर सर्व विभागप्रमुख यांच्या नियोजनाखाली हे प्रदर्शन यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनासाठी प्रा.अनुष्का काडगे यांनी मुख्य समन्वयक म्हणून काम पाहीले.

फोटो-डीकेटीईच्या आयाडीया लॅबमध्ये प्रदर्शनात सादरीकरण करीत असताना विद्यार्थी.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More