इचलकरंजी विधानसभेच्या रिंगणात विठ्ठल चोपडेंची राष्ट्रवादी कडून दावेदारी.
इचलकरंजी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केली असून इचलकरंजी शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी आगामी विधानसभा निवडणूक महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढवणार असल्याबाबतची घोषणा केली. याबाबत बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणाबाबत घेतलेल्या बैठकीनुसार व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याशी चर्चेचे निर्देश दिले त्याचबरोबर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून निवेदन देऊन इचलकरंजी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सोडवुन घ्या अशी मागणी केली.मागणी करण्यापूर्वीच महायुतीत हा मतदारसंघ इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मागितला असल्याची बातमी वरिष्ठ पातळीवरून समजली. इचलकरंजी शहरात एक वर्षांपूर्वी संघटनेचे पक्षाचे पद स्वीकारल्यानंतर संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न केले असून चांगली बांधणी करण्यामध्ये यश आलेले आहे. काही नगरसेवक वगळता आठ ते दहा माजी नगरसेवक आमच्या सोबत असून आम्ही सर्वांनी परिश्रम घेतल्याने इचलकरंजी शहरातील बरीच कामे मार्गी लावत आहोत.त्यातील वस्त्रोद्योगातील वीजदर सवलतीचा प्रश्न अजितदादांनी मार्गी लावला आहे.सुळकुड पाणी योजनेसंदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहेत. इचलकरंजी शहरासाठी मी निवडून आल्यानंतर चार महिन्यांमध्ये जर पाणीपुरवठा व्यवस्थित करू शकलो नाही तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन असेही त्यांनी सांगितले.
विद्यमान आमदार प्रकाश आवडे यांच्यावर टीका करताना पाणी प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधी म्हणून जी भूमिका घेणे आवश्यक होते की भूमिका गेल्या पाच वर्षात कधीच घेतली नाही माझ्या पाणीपुरवठा सभापतीच्या कालावधीत इचलकरंजी शहरांमध्ये एक वर्षात ४४ वेळा गळती लागली कोरोनाचा कठीण काळ होता तरीही एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यामध्ये यश मिळवले गळतीचा कोणत्याही पद्धतीने पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ दिला नाही. त्याअनुषंगाने २०२२ मध्ये सुद्धा पाणीटंचाई असताना जिल्हाधिकारी यांनी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत उन्हाळ्याच्या कालावधीत माझ्यावर पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आमच्याकडे फॉर्म्युला तयार असून शहराला शुद्ध व मुबलक पाणी आम्ही देऊ. पाणीप्रश्न,यंत्रमग,वीजदर सवलतीची अंमलबजावणी यामध्ये अजितदादांनी यामध्ये विशेष लक्ष घातले असून २९ हजार मिळकतींचा क १ शेरा असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज व बांधकाम परवाने मिळत नाहीत. तो शेरा काढण्यासाठी काम प्रगतीपथावर आहे.पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर इचलकरंजी शहरात असलेली ४८ कोटी रुपयांची शास्ती रद्द करण्याची मागणी केलेली आहे त्यावरही लवकर निर्णय होणार आहे.पाणीप्रश्नी दिनांक १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी मी व मुश्रीफ साहेब आमच्या पातळीवर एकमत करून हा प्रश्न सोडवून घेतो असे सांगितल्याने त्यांनी जबाबदारी घेतली आहे असा खुलासा केला.
त्याचबरोबर महायुतीच्या तिन्ही पक्षात समन्वय असून राष्ट्रवादीचा आमदार व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे व आगामी निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पत्रकार परिषदेत सुभाष मालपाणी,अशोक पाटील, तोफिक मुजावर,अगणु लवटे,किरण माळी,शहाजहान टक्कळकी, अशोक पाटणी,विवेक चोपडे, बाळासाहेब देशमुख,श्रीकांत कांबळे,दत्ता देडे,अनिकेत चव्हाण,पूर्णांनंद सव्वाशे,उत्तम कुंभार उपस्थित होते
पाणीप्रश्नी शाहू महाराज,सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करावी.
पाणी प्रश्नी तत्कालीन पालकमंत्री व विधानपरिषद आमदार सतेज पाटील,विद्यमान खासदार शाहू महाराज यांनीही आमच्या शहराला पाणी देणार का नाही याबाबत भूमिका स्पष्ट केली पाहिजे असेही चोपडे यांनी स्पष्ट केले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800