विद्यार्थ्यांची थकीत ३२०० कोटी शिष्यवृत्ती त्वरित वर्ग करा-स्वाभिमानी विद्याथी परिषदेची मूक मोर्चाद्वारे मागणी.

कोल्हापूर (प्रतिनिधी)- राज्यात विद्यार्थ्यांची सुमारे ३२०० कोटी रूपये शिष्यवृत्ती थकीत असून सदर शिष्यवृत्ती शासनाने तातडीने वर्ग करावी, अशी मागणी करत कोल्हापूर येथील पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यााजवळ स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने मूक निदर्शने करण्यात आली.
राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर होत असून अनेक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून अनेकवेळा या संदर्भात आंदोलने तसेच संबंधित विभागाल पत्रव्यवहार करून मागणी केली आहे. मात्र शासनाने याकडे सोपस्कर दुर्लक्ष केले आहे. लाडक्या बहिण योजनेसाठी राज्य सरकारने सरकारची तिजोरी रिकामी केली आहे. याच बहिणीच्या भावाचे शिष्यवृत्तीचे पैसे अडकले आहेत. लालफितीच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांना पैसे मिळत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत. थकीत शिष्यवृत्ती संदर्भात महिनाभर पाठपुरावा करूनसुद्धा निर्णय झाला नाही, यामुळे उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या सरकारमधील सर्व मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून जाब विचारणार असल्याचा इशारा सौरभ शेट्टी यांनी दिला. यावेळी अण्णा सुतार, शिवेंद्र माने, आदित्य खिचडे, वर्धमान गुंडे आदि उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800