४-१०-२०२४ रोजीची कोल्हापूर येथील करविरनिवासीनी महालक्ष्मी अंबाबाईची गजेंद्रलक्ष्मी रूपातील पुजा
कोल्हापूर
आज अश्विन शुक्ल द्वितिया शारदीय नवरात्र महोत्सव 2024 च्या आजच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची गजेंद्र लक्ष्मी रुपात पूजा साकारली आहे.
श्री महालक्ष्मीच्या अंशातून विष्णूंची पत्नी असणारी लक्ष्मी प्रगट झाली कोणे एके काळी इंद्राने दुर्वास महर्षींनी दिलेल्या जगदंबेच्या प्रसादाचा अपमान केल्याने चराचरातील सर्व संपदा क्षीर समुद्रात बुडून जाऊ दे असा शाप दुर्वास ऋषींनी दिला. त्याला अनुसरून विष्णूंची पत्नी असणारी लक्ष्मी सुद्धा क्षीर समुद्रामध्ये बुडून गेली. यावर पर्याय म्हणून देवदैत्यांनी समुद्रमंथन केले . या समुद्रमंथनातून विष कौस्तुभ ऐरावत उच्चैश्रवा रंभादि अप्सरा सुरा पारिजातक विष्णूचे धनुष्य चंद्र कामधेनु या रत्नांबरोबरच देवी लक्ष्मी प्रगट झाली कमलासनस्था अशी लक्ष्मी प्रकट झाल्याबरोबर आठ दिशा तोलून धरणाऱ्या आठ हत्तींनी म्हणजे दिग्गजांनी तिच्यावर अभिषेक केला. देवीचे हेच स्वरूप गजेंद्र लक्ष्मी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात अनेक गावात गजेंद्र लक्ष्मीचे मंदिर आहे. दक्षिण महाराष्ट्र व कोकणात तिला भावकाई म्हणून सुद्धा ओळखले जाते. भावकाई भावेश्वरी या नावाने ओळखली जाणारी गजलक्ष्मी ही समृद्धीची देवता असेलली राष्ट्रकुट घराण्याचे प्रतीक म्हणून सुद्धा मानले जाते कमळावरती विराजमान आणि दिग्गजांकडून अभिषेक घातली जाणारी लक्ष्मी ही संपूर्ण संपन्नतेचे प्रतीक मानले जाते यासाठी सर्व प्रकारच्या भौतिक वैभव साठी गजलक्ष्मीची पूजा केली जाते. अशी ही गजेंद्र लक्ष्मी तुम्हा आम्हाला समृद्ध जीवन प्रदान करो हीच तिच्या चरणी प्रार्थना
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्नसशक्तिकः
व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा
https://youtu.be/YhGYUz6CSvI?si=_pR127hhBYPXKT9i

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800