इचलकरंजी विधानसभेसाठी महायुतीचे समन्वयक जाहीर,अशोक स्वामी,रवींद्र माने,श्रीकांत कांबळे यांचा समावेश.
इचलकरंजी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकांची आज घोषणा करण्यात आली.समन्वयक पदी भारतीय जनता पार्टी वतीने महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी (आण्णा) यांची नियुक्ती तर शिवसेना ( शिंदे ) पक्षाचे जिल्हाप्रमुख रविंद्र माने, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने श्रीकांत कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आगामी काळात महायुतीची व्यूहरचना करणे व प्रचारयंत्रणा राबवणे यामध्ये महत्वपुर्ण भूमिका बजावावी लागणार आहे.अशोक स्वामी यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव महायुतीला कामाला येणार असून आवाडे हाळवणकर कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800