प्रचंड शक्तिप्रदर्शनात महायुतीच्या राहुल आवाडेंचा उमेदवारी अर्ज दाखल.
इचलकरंजी:
विजयाचा जयघोष, वाद्यांचा गजर, जमलेला प्रचंड जनसागर आणि ज्येष्ठ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे म्हणजे महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल आवाडे यांनी गुरुवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवार अर्ज दाखल केला.
इचलकरंजी विधानसभा मतदार संघात महायुती च्या वतीने भारतीय जनता पार्टी तर्फे राहुल आवाडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. गुरुवारी राहुल आवाडे यांनी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त साधत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भगवे झेंडे, स्कार्फ आणि टोप्या यामुळे संपूर्ण परिसर भाजपमय झाला होता. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. विविध वाद्यांचा गजर आणि प्रचंड जय घोषामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
महात्मा गांधी पुतळा याठिकाणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर, निपाणीच्या आमदार तथा पक्ष निरिक्षक शशिकला जोल्ले, समन्वयक अशोक स्वामी, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, श्रीनिवास कांबळे आदिसह महायुतीतील घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.







महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरू झालेली रॅली मुख्य मार्गाने शिवतीर्थ याठिकाणी आल्यानंतर राहुल आवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रांत कार्यालय येथे आल्यानंतर प्रमुख मान्यवरांसह राहुल आवाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी प्रकाश दतवाडे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे, तानाजी पोवार, भाजपा शहराध्यक्ष पै.अमृत भोसले, जयेश बुगड, अनिल डाळ्या, प्रसाद खोबरे, सौ. किशोरी आवाडे, मौश्मी आवाडे, अश्विनी कुबडगे, उर्मिला गायकवाड आदिसंह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व आवाडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल आवाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, आण्णाभाऊ साठे, श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार, स्व. बाबासाहेब खंजिरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत त्यांचे आशिर्वाद घेतले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800