बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड.राजगोपाल तोष्णीवाल तर उपाध्यक्षपदी अॅड.राजाराम सुतार,सत्तारूढ गटाचे ६ विरोधी गटाचे ३ उमेदवार विजयी.
इचलकरंजी
दि इचलकरंजी बार असोसिएशनची द्विवार्षिक निवडणूक गुरूवारी अत्यंत चुरशीने पार पडली. मतदान प्रक्रियेत ४५९ सदस्यांपैकी ४३६ सदस्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. सत्तारूढ गटाचे सहा तर विरोधी गटाचे तीन उमेदवार विजयी झाले. विरोधी पॅनेलच्या अॅड.राजगोपाल तोष्णीवाल यांनी अध्यक्षपदावर तर सत्तारूढ गटाच्या अॅड.राजाराम सुतार यांनी उपाध्यक्ष पदावर विजय मिळवला.
बार असोसिएशनच्या द्विवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, महिला प्रतिनिधी आणि तीन कार्यकारीणी सदस्य अशा ९ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते.गुरुवारी सकाळी ९ वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सायंकाळी ५ पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. रात्री उशिरा मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष, सेक्रेटरी या उमेदवारांमध्ये सुरूवातीपासूनच चुरस सुरू होती. चुरशीने झालेल्या मतदानात अखेर विरोधी गटाच्या अॅड.तोष्णीवाल (२३३) यांनी बाजी मारली. तसेच उपाध्यक्षपदी अॅड.सुतार (२४०), सचिवपदी अॅड.अभिजीत माने (२२२), सहसचिवपदी अॅड.आदित्य मुदगल (२३५), खजिनदार पदासाठी अॅड.विजय शिंगारे (२२१), महिला प्रतिनिधी पदासाठी अॅड.दिपाली हणबर (२४७), तीन कार्यकारीणी पदासाठी अॅड.महेश कांबळे (२२३), अॅड.राहुल काटकर (२१५), अॅड.शैलेंद्र रजपुत (२२४) विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. जी.जे. सावंत तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. राजीव शिंगे, अॅड. निता परीट यांनी काम पाहिले. त्यांना सहायक म्हणून प्रवीण फगरे, विष्णू उरणे यांनी काम पाहिले. विजयानंतर उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला होता.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800