घराणेशाही टिकवण्यासाठी आवाडे दीर्घकाळ प्रयत्नशील,विकासाच्या मार्गावर वाटचालीसाठी कारंडेना आमदार करूया-मेघा चाळके.
इचलकरंजी :
राजकारणात आवाडे कुटुंबीयांनी घराणेशाही टिकवण्यासाठी दीर्घ काळापासून प्रयत्न केले आहेत. तर स्वतःचे संविधानिक पद कायम राखण्यासाठीच आवाडे कुटुंबीय कार्यरत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष सौ मेघा चाळके यांनी करत आता विकासाच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना निवडून द्या असे आवाहन केले.
येथील महाराणा प्रताप चौकात महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या इचलकरंजीच्या प्रगतीसाठी योग्य नेतृत्वाची आणि दृढ विकास दृष्टिकोनाची गरज असल्याचे सांगत उमेदवार कारंडे हे इचलकरंजीच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करतील असेही त्या म्हणाल्या. मागील प्रशासनात गाव भागातील रस्ते व गटारीच्या अपूर्ण कामांचा उल्लेखही चाळके यांनी यावेळी नमूद केला.
शशांक बावचकर म्हणाले, आवाडे यांनी काँग्रेस पक्षाशी बेईमानी करून भाजपला पाठिंबा देणे आणि नंतर थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयामुळे जनतेचा विश्वासघात, केल्याचा आरोप बावचकर यांनी यावेळी केला. यास अजित मामा जाधव यांनीही आवडे यांच्या पक्षांतरावरून टीका केली. या सभेला अरुण पाटील, मलकारी लवटे, सदा मलाबादे, सौ. दीपाली बेडक्याळे, प्रकाश सुतार, वसंत कोरवी,सदा मिरजे, भूषण माने, विलास शिंदे, कुमार बेडक्याळे, बाबू शिंदे, राजू आगरने, सुदर्शन पाटील, सय्यद भाबी, समरर्जीत पाटील, अमीर मुजावर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800