राष्ट्र सेवा दलाचा गुणवंत शिक्षक, सेवक पुरस्कार सोहळा संपन्न.
इचलकरंजी : महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनाला खरा शिक्षक दिन मानून इचलकरंजी परिसरातील गुणवंत शिक्षक आणि सेवकांना पुरस्कार देवून सन्मानित केले जाते. साने गुरुजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हा पुरस्कार आणि साने गुरुजी प्रेरणा पुरस्कार असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला.
मासूमच्या फेलो रुचिता पाटील यांच्या अखंड गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. मान्यवरांच्या हस्ते फुले दांपत्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्र सेवा दलाच्या कार्याध्यक्ष इंद्रायणी पाटील यांनी स्वागत केले. सुनिल स्वामी यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख करुन दिली. संघटक रोहित दळवी यांनी अहवालवाचन केले.
गुणवंत शिक्षकांमध्ये गीता खोचरे, (मुख्याध्यापक, आदर्श विद्यामंदिर) प्रमोद कोळेकर , (कला शिक्षक, द न्यू हायस्कूल) यांचा तर गुणवंत सेवक मध्ये सीमा नेजे , (ग्रंथपाल, गंगामाई गर्ल्स हायस्कूल), रामचंद्र पाटील (ग्रंथपाल, आंतरभारती विद्यालय) यांचा समावेश होता. याचसोबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती इचलकरंजीवतीने शिक्षकांसाठी दिला जाणारा जागर पुरस्कार बालाजी हायस्कूलचे कुमार कांबळे यांना प्रदान करण्यात आला.
साने गुरुजी प्रेरणा पुरस्कार हे सनोफर नायकवडी, (विवेकवाहिनी तथा पत्रकार), सादिक जमादार, (चाँदतारा विद्यार्थी अभ्यासिका), प्रमोद आवळे, (राष्ट्र सेवा दल कबनूर), निलेश बनगे, ( वृक्षमित्र) या सामाजिक कार्यकर्त्यांना देवून सन्मानित करण्यात आले. ग्रंथभेट, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. यासाठी साथी यदुनाथ थत्ते विचार जागर समिती महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे.
प्रमुख पाहुणे हेरंब कुलकर्णी यांनी साने गुरुजींच्या जीवनाचा पट उलगडत अत्यंत मौलिक अशी मांडणी केली. पुरस्कार समारंभाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र अंनिस कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष डाॅ. बी एम हिर्डेकर म्हणाले, विवेकी समाजाच्या उभारणीसाठी शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते यांचा महासमन्वय घडविण्याची वेळ आली आहे.
समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी या ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमास अशोक चौगुले, प्रतिमा कुलकर्णी, शरद वास्कर, सुनिल पोवार, अशोक केसरकर, अनिल होगाडे,नौशाद शेडबाळे, लतिफ गैबान, विमल काटकर, शैलेश खुडे, संभाजी खोचरे, सुनिता बिरनाळे, विजया नकाते, किरण कटके, बजरंग लोणारी आदिंसह कार्यकर्ते, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मच्छिंद्र आंबेकर, आरिफ पानारी, दामोदर कोळी, साद चांदकोटी,पवन होदलूर, ओम कोष्टी ,गौरी कोळेकर,वैभवी आढाव आणि अशोक वरुटे यांनी प्रयत्न केले.
संजय रेंदाळकर यांनी सूत्रसंयोजन केले तर स्नेहल माळी यांनी आभार मानले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800